Khantoli - Untold Maharashtrian Dessert Recipe | खांतोळी

Khantoli - Recipe in English


We would like to share the mouth-watering unrevealed , secret recipe of Maharashtrain Dessert - Khantoli. This is unique-one of its kind sweet which is seldom known by many-can be made in your kitchen too. Khantoli recipe still remains unpublished and has a quality of honest-to-goodness sweet recipe.This rare-known sweet is made from rice, jaggery and lot more ingredients to go in with. Treat your taste buds with this delicious sweet. Read more!



पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे

बनविण्यासाठी लागणारा वेळ: ३० मिनिटे

नग: ३० वडया

कृती स्रोत : माझी आई 

साहित्य:

१) तांदूळ दीड वाटी
२) गुळ दीड वाटी
३) १ वाटी तूप
४) ओल्या खोबऱ्याचे तुकडे
५) १ चमचा हरभऱ्याची डाळ
६) २ चमचे मुगाची डाळ
७) १/२ वाटी शेंगदाणे
८) काजू आवडीनुसार
९) पाणी
१०) हळद
११) १ छोटा चमचा जीरे
१२) मीठ चविनुसार
१३) २  हळदीची पाने

कृती:

तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.

एका कापडावर पसरून घ्यावे व साधारण १ तासाने त्याचा बारिक रवा करून घ्यावा.

आईने इथे जात वापरल आहे पण तुम्ही मिक्सर वरही बारिक करू शकता.








पण मिक्सरवर करत असताना तांदळाचे पीठ होणार नाही याची काळजी घ्यावी.

हा वटलेला रवा चाळणीने चाळुन घ्यावा.





चण्याची डाळ भिजू घालावि.

तव्यावर शेंगदाणे  भाजून घ्यावे.





शेंगदाणे झाले की त्याच तव्यावर मुग डाळ व  काजूचे तुकडे भाजून घ्यावे.




खोबऱ्याचे बारिक काप करून घ्यावे.





गूळ किसुन घ्यावा.



एका जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करावे त्यात बनवून घेतलेला तांदळाचा रवा खमंग भाजून  घ्यावा.





रवा झाला की लगेचच बाजूला काढून घ्यावा.




त्याच भांडयामध्ये बेताचे पाणी घालावे.





पाण्याला उकळी आली की त्यात मीठ, हळद, जीरे, शेंगदाणे, काजू, भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, खोबऱ्याचे काप घालावे  व शिजू दयावे.





पाण्यातील सर्व साहित्य शिजले की भाजून घेतलेला तांदळाचा रवा घालावा.






मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.





मिश्रणातले पाणी मुरले की किसलेला गूळ घालावा सतत ढवळत राहावे.





गूळ वितळला व मिश्रण घट्ट होत आले की गॅस बारिक करून त्यावर हळदीची पाने ठेवावी.







झाकण ठेवून १० मिनिटे गूळ व  रवा मुरु दयावा.


ताटाला तूप लावून घ्यावे.


त्यावर तयार मिश्रण घालावे व हाथाने पसरुन घ्यावे.







तुकडे पाडून घ्यावे.



खांतोळी तयार आहे खाण्यासाठी.







Related

Traditional 6189940972173515532

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item