कोबी फ्लॉवर पोहे | Kobi Flower Pohe
http://nilamsrecipes.blogspot.com/2013/11/kobi-flower-pohe.html
Kobi Flower Pohe in English
वेळ :
१५ मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)दगड़ी पोहे २ वाट्या
२)१/२ वाटी बारीक चिरलेली कोबी फ्लॉवर भाजी
३)२ छोटे चमचे तेल
४)१/२ चमचा जीरे
५) १/२ चमचा मोहरी
६)२ हिरव्या मिरच्या
७) कढीपत्ता
८)थोडीशी साखर
९)कोथिंबिर
१०)हळद
११)लिंबु
१२)चवीनुसार मिठ
कृती :
पोहे चांगले धुऊन मिठ आणि हळद लाऊन १० मिनिटे ठेवावे.
नंतर एका कढ़ई मध्ये तेल गरम करुण त्यात फोडणीचे साहित्य घालावे , हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता थोडासा भजलाकी कोबी भाजी घालून ५मिनिटे वाफ येऊ द्यावी.
नंतर त्यात पोहे घालावे.
थोडेसे परतून झाकण लाऊन पुन्हा ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी.
नंतर त्यात थोडीशी साखर आणि लिंबू रस घालावे.