कॉर्न पोहे | Corn Pohe
http://nilamsrecipes.blogspot.com/2013/11/corn-pohe.html
कॉर्न पोहे( Corn Pohe )
वेळ :
१५ मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)दगड़ी पोहे २ वाट्या
२)१वाटी पिवळे कॉर्न्स (मक्याचे दाने)
३)२ छोटे चमचे तेल
४)१/२ चमचा जीरे
५) १/२ चमचा मोहरी
६)२ हिरव्या मिरच्या
७) कढीपत्ता
८)थोडीशी साखर
९)हळद
१०)कोथिंबिर
११)लिंबु
१२)चवीनुसार मिठ
कृती :
पोहे चांगले धुऊन मिठ आणि हळद लाऊन १० मिनिटे ठेवावे.
नंतर एका कढ़ई मध्ये १/२चमचा तेल गरम करुण त्यात कॉर्न्स घालून एक पाण्याचा हपका मारून,व चिमुटभर मिठ घालून झाकण लाऊन २-३मिनटे ठेवावे.
नंतर एका भांड्यात उरलेलं तेल घालून फोडणीचे साहित्य घालावे.
नंतर त्यावर कॉर्न्स घालून परतावे व पोहे थोडेसे परतून झाकण लाऊन ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी.नंतर त्यात थोडीशी साखर आणि लिंबू रस घालावे.
देताना कोथिबीर घालून द्यावे.