मालवणी कांदे पोहे | Malvani Kande Pohe
http://nilamsrecipes.blogspot.com/2013/11/malvani-kande-pohe.html
Malvani Kanda Poha in English
वेळ :
२०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)दगड़ी पोहे २ वाट्या
२)२ कांदे
३)२ छोटे चमचे तेल
४)१/२ चमचा जीरे
५) १/२ चमचा मोहरी
६)हळद
७)२ हिरव्या मिरच्या
८) कढीपत्ता
९)थोडीशी साखर
१०)कोथिंबिर
११)लिंबु
१२)१/२ वाटी ओंल खोबर
१३)चवीनुसार मिठ
कृती :
पोहे चांगले धुऊन १० मिनिटे मिठ व हळद लाऊन ठेवावे .
नंतर एका कढ़ई मध्ये तेल गरम करुण त्यात फोडणीचे साहित्य घालावे , हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता थोडासा भजलाकी उभा चिरलेला कांदा त्यात घालावा.
कांदा लालसर झाला की पोहे घालावे.
थोडेसे परतून झाकण लाऊन ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी.
नंतर त्यात थोडीशी साखर आणि लिंबू रस घालावे.
देताना वरून ओंल खोबर व कोथिबीर भुरभुरावी.