भाजणीच्या पिठाचे थालीपीठ/Bhajni Thalipeeth
Bhajni Tahlipeeth in English वेळ : १५मिनिटे , २ व्यक्तीन साठी. साहित्य : १) भाजणीचे पीठ २ वाट्या २)१मोठा कांदा ब...
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/02/bhajnicya-pithacyhe-thalipith.html
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)भाजणीचे पीठ २ वाट्या
३)२छोटे चमचे लाल तिकट
४)१ छोटा चमचा जिरे
५)हळद
६)चविनुसार मिठ
कृती :
प्रथम एका भांडयात भाजणीचे पिठ घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा,लाल तिखट,जिर ,आणि कोथिंबीर आणि मिठ व हळद घालून पिठ चांगले मळून घ्यावे.
मळून पिठाचा गोळा १० मिनिटे बाजूला करून ठेवावे.
एक गोळा घेऊन प्लास्टिक शीटवर थापून घ्यावे.
मध्यभागी बोटाने एक छिद्र करून घ्यावे, म्हणजे त्यात तेल सोडता येते.
तव्यावर थोडेसे तेल सोडून थालिपीठ घालेवे.
छिद्रात थोडेसे तेल सोडावे.
भाजणीचे पिठ:
तांदूळ २ वाटी,१/२वाटी गहू,१/२वाटी चण्याची डाळ,पाव वाटी उडदाची डाळ,ज्वारी ,बाजरी,मुगाची डाळ सर्व खमंग भाजून घ्यावेत हवे असल्यास १०-१२ मेथ्यांचे दाने व २-३ लाल मिरच्याही भाजून भाजणीत घालून बारीक दळून आणावे .