अळूच्या गाठींची भाजी | Aluchya Gathyanchi Bhaji
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/aluchya-gathyanchi-bhaji.html
अळूच्या गाठींची भाजी | Aluchya Gathyanchi Bhaji
१० मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१०-१२ भाजीच्या अळूची पाने
२)१/२ वाटी शेंगदाणे
३)हळद
४)६-७ हिरव्या मिरच्या
५)२-३ लसणाच्या पाकळ्या
६)१/२ वाटी ओला खोबर
७)४ छोटे चमचे तेल
८)५-६ कोकम
९)आवडीनुसार मिठ
वेळ :
१० मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१०-१२ भाजीच्या अळूची पाने
२)१/२ वाटी शेंगदाणे
३)हळद
४)६-७ हिरव्या मिरच्या
५)२-३ लसणाच्या पाकळ्या
६)१/२ वाटी ओला खोबर
७)४ छोटे चमचे तेल
८)५-६ कोकम
९)आवडीनुसार मिठ
कृती :
अळूची पान ४-५ तास हवेवर वाळू दयावीत. थोडीशी वाळली की एका पानाचे मधोमध दोन भाग करून त्याची सुरळी करून गाठ तयार करून घ्यावी. एका भांडयात तेल गरम करून त्यात लसणाच्या पाकळ्या थोड्याश्या ठेचून घालाव्या,लालसर झाल्या की हिरव्या मिरच्या घालाव्या. आता तयार केलेल्या गाठी घालाव्यात.
शेंगदाणे प्रेशर कुकरला लावून शिजवून घ्यावे. हे शेगदाणे,मिठ,हळद आणि थोडं पाणी गाठीत घालुन झाकण ठेऊन गाठी शिजू द्याव्या. जास्त पाणी घालू नये. जास्त शिजलेल्या गाठी बेचव होतात. थोडयाश्या शिजल्यावर कोकम खोबर घालावे.