कलाकंद

Kalakand in English

वेळ :  

३०मिनिटे ,
१५-१६ मध्यम आकाराचे तुकडे.



साहित्य :

१)१ लिटर दुध
२)१/२ छोटा चमचा लिंबाचा रस 
३)दीडशे  ग्राम खावा 
४)साधरण १५० ग्राम साखर आवश्यक वाटल्यास जास्त घालू शकता 
५)वेलची पूड
६)बदामाचे व पिस्ताचे काप 

कृती:

दुध जाड बुडाच्या पातेल्यात गरम करत ठेवावे. दुध गरम झाले कि ह्या दुधात लिंबु रस घालावे  ग्यासवरून बाजुला घेऊन थंड करावे. 

एका सुती कपडयात हे पनीर बांधुन ठेवावे. वरून धुवून घ्यावे म्हणजे लिंबुचा आंबट वास निघून जाईल. 

गच्च पिळुन लगेचच एका भांडयात काढून घ्यावे. 

खावा आणि साखर एकत्र करून एका भांडयात मंद ग्यासवर गरम करत ठेवावे. 

साखर वितळेपर्यंत ढवळत राहावे. 

साखर वितळलीकी पनीर घालुन सतत ढवळत राहावे. वेलची पूड घालावी.  

मिश्रण आळून गोळा झाले की एका प्लेटला तुप लावून त्यावर काढुन घ्यावे, आणि जाडसर थापावे. 

त्यावर बदाम पिस्ताचे काप घालावे.

थोडसे सेट झालेकी छान तुकडे पडावे. 








                   




Related

Sweets 3378256856519719684

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item