नारळी भात । Narali Bhat
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/05/narali-bhat.html
Narali Bhat in English
४५ मिनिटे
साहित्य:
१) १ वाटी तांदुळ
वेळ :
४५ मिनिटे
साहित्य:
१) १ वाटी तांदुळ
२) २ वाटी पाणी
३) ४ चमचे तुप
४) १/२ चमचा वेलची पूड
५) ३-४ लवंगा
६) दीड वाटी गूळ किसलेला
७) २ वाटया खवलेला नारळ
७) २ वाटया खवलेला नारळ
८) १०-१२ काजू
९) १०-१२ बेदाणे
१०) ४-५ बदाम
९) १०-१२ बेदाणे
१०) ४-५ बदाम
कृती :
तांदुळ स्वच्छ धवून निथळून घ्यावे.
एका भांडयात तुप गरम करावे. लवंग त्यात भाजून घ्यावी.
तांदुळ तुपावर घालून छान परतून घ्यावे.
दुसऱ्या ग्यासवर पाणी गरम करून घ्यावे, आणि तांदुळावर घालावे .
मध्यम आचेवर भात शिजवून घ्यावा. भात शिजला कि एका ताटात पसरून मोकळा करावा.
हलक्या हाताने पसरावा, शिते मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
नारळ आणि गूळ एकत्र करून घ्यावे. भात गार झाला कि हलक्या हाताने नारळ आणि गूळ घालुन घ्यावे.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तुप गरम करावे. त्यात काजू आणि बेदाणे तळून बाजूला काढून घ्यावे.
गरम तुपात वरिल नारळ गूळ आणि भाताचे मिश्रण घालून परतावे. ग्यास मंद करून घ्यावा.
घट्ट झाकण लावून ३-४ वाफा काढाव्यात. मधून मधून हलकेच भात वरखाली हलवत राहावा.
१०-१५ मिनिटे शिजु दयावा.
गूळ वितळू लागला की भात पातळ होईल आणि काही वेळाने तो आटेल.
एकदा का भात शिजला कि झाकण काढून २-३ मिनिटे भात शिजवावा, म्हणजे उरलेलं पाणी मुरून जाईल.
तळलेले काजू आणि बेदाणे घालावे.
देताना वरून तुप आणि बदामाचे काप घालावे आणि गरमा गरम सर्व्ह करावा.