Kakdi Vade | काकडी वडे
Kakdi Vade in English वेळ : २० मिनिटे ४ जणांसाठी साहित्य : १) ३ वाटया तांदुळाचे पिठ २) १ वाटी काकडीच कीस ३) ...
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/kakadi-vade.html
वेळ :
२० मिनिटे
४ जणांसाठी
साहित्य:
१) ३ वाटया तांदुळाचे पिठ
२) १ वाटी काकडीच कीस
३) १ चमचा जिरे पूड
४) १/२ चमचा बडीशेप
५) २-३ चमचे तिखट
६) चवीपुरते मीठ
७) तूप
कृती:
एका ताटात तांदुळाचे पिठ घ्यावे, त्यात तूप चांगले एकजीव करून घ्यावे.
जिरे पूड, तिखट,मीठ, व ठेचलेली बडीशेप घालून घ्यावे.
काकडीचे कीस घालून पिठ घट्टसर भिजवून घ्यावे.
हातावर किंवा प्लास्टिकच्या कागदावर वडे थापावेत.
तूपात तळून घ्यावेत.
गरम गरम खावयास दयावे.
हे वडे गोड दह्यासोबत छान लागतात.