मेथी पिठलं | Methi Pithla


२० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.

साहित्य:

१) १ कप बारिक चिरलेली हिरवी मेथी 
२) १ कप बेसन   
३) हळद 
४) मिठ  चवीनुसार
५) ४-५ हिरव्या मिरच्या 
६) १ छोटा चमचा आलं लसुन पेस्ट
७) १/२ छोटा चमचा जिरे
८) १/२ छोटा चमचा मोहरी

९) कढीपत्त्याची पाने 
१०) कोथिंबीर
११) तेल फोडणीसाठी





कृती:

एका कढईत तेल गरम करावे. 

तेल गरम झाले की मोहरी घालावी, ती तडतडली कि जिरे ,कढीपत्ता,बारिक चिरलेली हिरवी मिरची  आणि बारिक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यावा. 



५ मिनिटे परतल्यावर आलं लसून पेस्ट घालून परतावे. 

बारिक चिरलेली मेथी घालून परतावे.  वरून मिठ घालावे. 



झाकण लावून ५ मिनिटे शिजू दयावी. 

जर वाटल तर थोडासा पाण्याचा हपका मारवा. 

५ मिनिटांनी २ कप पाणी व हळद घालून उकळी येऊ दयावी. 

एका भांडयात बेसन घेऊन पाणी घालून पातळ घोळ बनवून घ्यावा.

एकदाका मेथीच्या पाण्याला उकळी आली की बेसनाचा घोळ थोडा थोडा घालावा. 

बेसनाच्या गुठळ्या होणार नाही या साठी उकळी येईपर्यंत ढवळत राहावे. 



ग्यास कमी करून झाकण ठेवून बेसण चांगले शिजू दयावे. 

५ मिनिटांनी ग्यास वरून बाजूला घेवून कोथिंबीर घालून गरमा गरम भातासोबत किंवा 
तांदुळाच्या भाकरी सोबत  खावयास दयावे. 


Related

Vegetables 1240707060806162275

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item