उपवासाची बटाटा भाजी | Upavasachi Batata Bhaji

Upavasachi Batata Bhaji in English वेळ :   २० मिनिटे   २ व्यक्तींसाठी . साहित्य   : १ ) २ - ३ उकडलेले बटाटे   २ )   ५...


वेळ:  
२० मिनिटे 
२ व्यक्तींसाठी.
साहित्य :
१) २-३ उकडलेले बटाटे 
२) ५-६ हिरव्या मिरच्या
३) १/२ वाटी शेंगदाणा कूट 

४) ४-५ कढीपत्त्याची पाने 

५) १/२ छोटा चमचा जीरे  

६) कोथिंबीर बारीक चिरून 

७) ओल खोबर 

८) १ छोटा चमचा साखर  

९) तेल फोडणीसाठी 

१०) मीठ चवीनुसार

कृती:
प्रथम एका भांडयात तेल गरम करून त्यात जीरे, कढीपत्ता व बारिक  चिरलेली हिरवी मिरची घालावी.

शेंगदाण्याच कूट घालून ५ मिनिटे परतावे.

उकडून घेतलेले बटाटे सोलून त्यांच्या बारिक फोडी करून त्या वरच्या फोडणीवर घालून  चांगले परतून घ्यावे.

मीठ घालून परतावे झाकण ठेवून ५ मिनिटे मंद ग्यासवर भाजी होवू दयावी.

साखर, खोबरे व कोथिंबीर घालून खावयास घ्यावी.


Related

Fasting 1464808242788694988

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item