मेथी कढी गोळे
Methi Kadhi Gole in English पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे बनवण्यासाठी लागणारा वेळ : २० मिनिटे २ व्यक्त...
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/methi-kadhi-gole_28.html
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
१) २ वाटया दही
२) १छोटे चमचे चण्याचे पिठ
३) ४ छोटे चमचे आलं लसुन पेस्ट
४) ३ हिरव्या मिरच्या
५) १/२ चमचा लिंबू रस
६) कोथिंबीर
७) हिरव्या मेथीची पाने
८) जिरे
९) मोहरी
१०) कढीपत्त्याची पाने
११) २ चिमटी हिंग
१२) हळद
१३) मिठ चवीनुसार
१४) १ चमचा साखर
१५) २ चमचे तेल
१) चण्याची डाळ १ वाटी
२) १ छोटा चमचा आलं लसुन
३) ४ हिरव्या मिरच्या
४) जिरे
५) कोथिंबीर
६) १/२ वाटी बारिक चिरलेली हिरवी मेथी
७) १/२ वाटी बारिक चिरलेला कांदा
८) हळद
९) मिठ आवडीनुसार
गोळ्याची कृती :
चण्याची डाळ स्वच्छ धुवून ३-४ तास भिजू घालावी.
मिक्सरला चण्याची डाळ,आलं लसुन, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या लावून जाडसर वाटून घ्यावे.
वाटताणा पाणी घालू नये. नाहीतर मिश्रण पातळ होते व गोळे कढीमध्ये विरघळतात.
या मिश्रणात बारीक़ चिरलेला कांदा व १/२ वाटी बारिक चिरलेली हिरवी मेथी
घालून मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे.
कढीची कृती :
एका भांडयात तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता , हिरवी मिरची, हिंग व आलं लसुन पेस्ट व हिरवी मेथी घालून छान फोडणी तयार करावी.
भांडयावर झाकण ठेवून मंद ग्यासवर ५ मिनिटे कढी उकळू दयावी.