गाजर वडी
CarrotBurfi in english तयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे बनवण्यासाठी लागणारा वेळ : १ तास २ व्यक्तींसा...
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/carrot-burfi_30.html
बनवण्यासाठी लागणारा वेळ: १ तास
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) १/२ किलो गाजर
२) साखर १ कप
३) १/२ लिटर दूध
३) १/२ लिटर दूध
४) १ कप खवा
५) ३ मोठे चमचे तूप
६) १/४ छोटा चमचा वेलची पूड
७) १/२ वाटी बदाम, काजू, मनुका
८) पिस्ताचे काप
कृती:
गाजर स्वच्छ धुवून घ्यावे.
साल काढून किसुन घ्यावी व बाजूला करून ठेवावे.
जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करावे व त्यात किसलेले गाजर घालून मंद गॅसवर
ढवळावे.
साधारणतः १५-२० मिनिटांनी गजराचा रंग बदलू लागेल.
लगेचच दूध घालून गॅस थोडा मोठा करावा व दूध पूर्ण आटेपर्यंत मध्ये मध्ये ढवळत राहावे.
दूध आटले की खवा व वेलची पूड घालावी.
मिश्रण खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.
दूध व खवा पूर्ण आटल की साखर घालावी.
बदाम, काजूचे काप व मनुका घालावे.
एका ट्रेला तूप लावून त्यावर हे मिश्रण छान पसरून घ्यावे व साधारण २ तास सेट होण्यासाठी ठेवावे.
तुकडे पडून त्यावर पिस्ताचे काप लावून सर्व्ह करा.