पालक कोबीची वडी | Palak Kobi Vadi Recipe-Crispy



पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे 
बनविण्यासाठी लागणारा वेळ: २० मिनिटे,
एकूण लागणारा वेळ: ४० मिनिटे

पालक कोबी वडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

१) बारीक चिरलेला पालक ३/४ कप 
२) २-३ चमचे तांदूळ पीठ 
) १/२ कप बारीक चिरलेला कोबी 
४) २ चमचे बारीक चिरलेला कांदा 
५) १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर 
६) साधारण दीड कप बेसन 
७) २ छोटे चमचे लाल मिरची पूड 
८) १ छोटा चमचा आंल लसूण पेस्ट 
९) चीमुठभर हींग 
१०) हळद 
११) १/२ छोटा चमचा तीळ 
१२) १/२ छोटा चमचा जिरे 
१३) १ छोटा चमचा लिंबाचा रस 
१४) मीठ चवीनुसार 
१५) तळनासाठी तेल 


कृती:

एका बॉउल मध्ये, बेसन, तांदूळ पीठ, बारिक चिरलेला पालक, कोबी, कोथिंबीर, लाल मिरची पूड, आंल लसूण पेस्ट, तीळ, जिरे, हींग, हळद, लिंबू रस व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्यावे.


आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ चांगले एकजीव करून घ्यावे. 


एका प्लेटला तेल लावून घ्यावे.

त्यावर तयार मिश्रण घालावे. 


स्टीमर किंवा कूकर मध्ये पाणी ठेवून त्याला एक उकळली येवू दयावी
व लगेचच एका झाळीवर मिश्रणाचे ताट ठेवावे.


वरुन झाकण ठेवावे कूकर असल्यास शिट्टी लावू नये .
१० -१५ मिनिटे उकडू दयावे. 

१५ मिनिटांनी सूरीचे टोक त्यात टोचुन पहावे सुरीला मिश्रण चिकटले नाही तर वडी झाली असे समजावे.



वडया थंड होवू दयाव्यात त्याचे तुकडे पाडावे.


दुसरीकडे तेल गरम करून घ्यावे त्यात मंद ग्यासवर ह्या वडया तळुन घ्याव्या.



हिरव्या चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत गरमा गरम सर्व्ह कराव्यात.





Lables: Spinach vadi |Cookware | kitchenware.
Palak Kobi Vadi enjoyed best with chutney is a crispy preparation suitable for evening snack. Fill your moments with this light- hearted yet crispy dish.

Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Snacks 773150269924569240

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item