Poori Recipe | पुरी
Poori Recipe in English: पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे , बनवण्यासाठी लागणारा वेळ : ५ मिनिटे , एकूण लागणारा ...
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/03/poori-recipe.html
Poori Recipe in English:
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे,
बनवण्यासाठी लागणारा वेळ: ५ मिनिटे,
एकूण लागणारा वेळ : १५ मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
कणिक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१) गव्हाचे पीठ -१ वाटी
२) तूप १ चमचा
३) बारिक रवा -१/२
४) मीठ छोटा चमचा चवीनुसार
५) पाणी आवश्यकतेनुसार
ईतर साहित्य:
१) तेल तळनासाठी
२) गव्हाचे पीठ घोळन लावण्यासाठी (पूरी लाटताना लावण्यासाठी)
एका भांडयात पीठ चाळुन घ्यावे
थोडे थोडे पाणी घालून पीठ मळुन घ्यावे.
पाणी घालत असताना काळजी घ्यावी की कणिक जास्त पातळ किंवा घट्ट होणार नाही.
नरम होईपर्यंत पीठ छान मळावे.
१० मिनिटे बाजूला करून ठेवावे.
या पिठाचे लिंबू एवढे गोळे करून घ्यावे.
एक एक गोळा घेवून थोडयाश्या पिठात घोळून घ्यावा.
पोळपाटावर लाटून त्याची गोल पुरी बनवावी.
तेल गरम करून घ्यावे एक छोटा गोळा तेलात टाकून पहवा जर तो पटकन वर आला तर तेल तापले असे समजावे व पुरी तलावी.
पुरी तेलात टाकली की काही सेकंदानी झाऱ्याने थोडीशी दाबावी म्हणजे ती फुगते.
फुगली की लगेचच ती पलटावी व दुसऱ्या बाजूने ती तळुन घ्यावी.
अश्याप्रकारे सर्व पुऱ्या लाटून व तळुन घ्याव्यात.