Keshar Pista Shrikhand | केशर पिस्ता श्रीखंड
KesharPista Shrikhand in English: पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : ३ - ४ तास ४ व्यक्तींसाठी . साहित्य : चक्का बनवण्...
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/03/keshar-pista-shrikhand_21.html
४ व्यक्तींसाठी.
साहित्य:
चक्का बनवण्यासाठी लागणार साहित्य:
१) ताजे दही - २ कप
घरी बनवलेले असल्यास फारच छान
श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१) चक्का
२) पीठी साखर- १ कप
३) वेलची ४-५
४) केशर ६-७ काडया
५) कोमट पाणी -२ मोठे चमचे
६) ७-८ पिस्ता
चक्का बनवण्याची कृती:
एका मवु किंवा कॉटनच्या कापडात दही घट्ट बांधावे व कमित कमी ३ तास असे टांगून ठेवावे की त्यातील सर्व पाणी निघून जाईल.
किंवा बांधल्यावर तुम्ही त्यावर एखादे वजन ठेवून सुध्दा पाणी काढू शकता.
श्रीखंड बनवण्याची कृती:
पीठी साखर नसल्यास नार्मल साखर मिक्सरला लावून बारिक करून घ्यावी.
वेलचीची पूड करून घ्यावी.
केशरच्या काडया कोमट पाण्यात २० मिनिटे भिजू घालाव्यात.
हैंड ब्लेंडरचा उपयोग करून चक्का चांगला फेटून घ्यावा.
दाणे राहणार नाही याची काळजी घ्यावी.
या चक्क्यात आधीच करून ठेवलेली साखर व वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
लगेचच भिजवून ठेवलेला केशर पाण्यासकट वरील मिश्रणात घालावा व पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करावे.
पिस्ताचे काप करून घ्यावे.
वरील मिश्रण एका बॉउल मध्ये काढून त्यावर पिस्ताचे काप घालून फ्रिज मध्ये
निदान १ तास तरी ठेवावे.
थंडगार श्रीखंड पुरी सोबत सर्व्ह करावे.
टिप:
दही नेहमी ताजे घ्यावे आंबट दही शक्यतो वापरु नये.
केशर दूधाऐवजी कोमट पाण्यात भिजवले म्हणजे त्याचा रंग जश्याचा तसा राहतो.
वेलची पूड करताना वेलची सालासकट तव्यावर थोडीशी गरम करावी व मिक्सरला लावताना त्यात थोडी साखर घालून वाटावी म्हणजे सालहि वापरली जातात व सुगंधही छान येतो.