हिरव्या वाटाण्याची करंजी | Hirvya Vatanyachi (Matar) Karanji Recipe in Marathi




पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनिटे 
बनविण्यासाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
४ व्यक्तींसाठी.

साहित्य:

सारणासाठी:

१) १ वाटी  हिरवे वाटाणे 

२) २ हिरव्या मिरच्या 

३) १/२ वाटी कोथिंबीर 

४) १/२ छोटा चमचा धणे जिरे पूड 

५) १ छोटा चमचा हळद 

६) १/२ छोटा चमचा मोहरी 

७) तेल फोडणीसाठी 

८) मीठ चवीनुसार 




आवरणासाठी:

१) १ वाटी मैदा 

२) १ वाटी गव्हाच पीठ 

३) १/२ वाटी बारिक रवा 

४) १/२ वाटी तेल मोहनासाठी 

५) १ मोठा चमचा कॉर्न फ्लोर 

६) मीठ चवीनुसार 

७) तेल तळनासाठी 




कृती:

आवरणासाठी:

एका भांडयात मैदा, गव्हाच पीठ, रवा, कॉर्न फ्लोर, मीठ व गरम केलेल तेल (मोहन) घालून चांगले एकजीव करून घ्यावे.



आता थोडे थोडे आवश्यक तेवढे पाणी घालावे व घट्ट पीठ मळून घ्यावे.

 पीठ मळत असताना ते पातळ मळले जाणार नाही याची काळजी घ्यावी.

त्यासाठी पाणी अंदाज घेवून बेताबेताने घालावे.

पीठ मळून झाले की ते मवू कापडात साधारण १ तास झाकून ठेवावे.




कृती:

सारण:

एका भांडयात थोडे तेल गरम करावे त्यात वाटाणे घालून २-३ मिनिटे परतावे व बाजूला करून घ्यावे.



मिक्सला लावून क्रश करून घ्यावे.

त्याच भांडयात फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी  घालावी ती तडतडली की लगेचच जिरे, हिरव्या मिरच्या थोडयाश्या ठेचुन घालाव्या साधारण २ मिनिटांनी क्रश केलेले वाटाणे, हळद व मीठ घालून परतावे
झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ येवू दयावी.

५ मिनिटांनी झाकण काढावे व बारिक  चिरलेली कोथिंबीर घालावी व ग्यास वरुन बाजूला करावे.

थंड होवू दयावे.



या पुढील कृती:

वर तयार करून ठेवलेल्या पीठाचे एकाच अकाराचे समान गोळे करून घ्यावे.

हयातील एक एक गोळा घेवून पोळपाटावर लाटणीच्या सहाय्याने गोल व मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटून घ्याव्या.


पुरीच्या मध्यभागी करून ठेवलेले वाटाण्याचे सारण थोडेसे भरून घ्यावे व पुरीची पारी दुमडून करंजी करून घ्यावी.



अश्याप्रकारे सर्व करंज्या करून घ्याव्यात.

करत असताना भरून तयार असलेल्या करंज्या ओल्या कपडयाने झाकून ठेवाव्या.



तळणासाठी तेल गरम करावे व तयार कारंज्या छान खरपूस तळुन घ्याव्या.


गरम किंवा गार खावयास दयावा.




Hirvya Vatanyachi (Matar) Karanji Recipe is a spicy variant of sweet one made during festivals. Learn green peas gujiya recipe in marathi & Snack on it.

Labels : cookware , kitchen appliances , furniture 

Related

Snacks 3971143999817924446

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item