Palak Vada Recipe-Pukka Maharashtrian Recipes | पालक वडा
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/05/palak-vada.html
वेळ:
१० मिनिटे (भिजविण्याचा वेळ वगळून)
४ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) २ वाटया चण्याची डाळ
२) २ वाटया बारिक चिरलेला पालक
३) १ मोठा चमचा तांदूळ पीठ
४) १ छोटा चमचा जिरे
५) २ हिरव्या मिरच्या बारिक चिरलेल्या
६) कोथिंबीर
७) किसलेले आंल
८) ४-६ कढीपत्त्यांची पाने
९) मीठ चवीनुसार
१०) तेल तळनासाठी
कृती:
चण्याची डाळ निवडून धुवून घ्यावी व ४-५ तास भिजू घालावि.
५ तासांनंतर पाणी काढून टाकावे व चाळणीवर ठेवून १०-१५ मिनिटे पाणी गळू
दयावे.
मिक्सरला लावून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावी.
एका बॉउल मध्ये वाटलेली डाळ काढून घ्यावी त्यात तांदूळ पीठ,
बारिक चिरून घेतलेला पालक, बारिक चिरून घेतलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, बारिक
चिरलेला कढीपत्ता, किसलेले आंल, मीठ घालून मिक्स करावे पाणी घालण्याची आवश्यता नाही.
कढईत तळणाचे तेल गरम करावे.
चिमटिने थोडेसे पीठ तेलात सोडावे व पीठ वर आले तर तेल गरम झाले असे
समजून ग्यास कमी करावा व हळू हळू २-३ वडे तेलात सोडावे.
दोन्ही बाजूने छान खरपूस तळावे.
अश्याप्रकारे सर्व वडे तळावे.