सात कप्पी घावण । Saat Kappi Ghavan Recipe-Festival Recipes from Konkan

 Sat kappi Ghavan in Englishसात कप्पी  घावण । Sat kappi Ghavan

पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: ६-७ तास
बनविण्यासाठी लागणारा वेळ:  ३० मिनिटे
२ व्यक्तींसाठी

घवाण  बनविण्यासाठी  साहित्य:

१) १ वाटी साधे तांदूळ
२) पाणी
३) मीठ
४) १/२  वाटी तेल

सारण बनविण्यासाठी  साहित्य:

१) १ वाटी ओल खोबर
२) पाउन वाटी किसलेला गूळ
३) जायफळ पूड
४) मीठ चविनुसार
५) १ छोटा चमचा तूप

सारण बनविण्याची कृती:

वर दिलेले सरणाचे सर्व साहित्य एका  भांडयात  घ्यावे  व हाथाने गुळ कुस्करून घ्यावा.


हे   सारण शिजविण्याची अवश्यक्यता नसते.घावण बनविण्याची कृती:

तांदूळ स्वच्छ धुवून ६-७ तास भिजू घालावे सकाळी करायचे असल्यास रात्री भिजू घालावे.

सकाळी  पाण्यतून उपसून मिक्सरला लावून बारिक वाटून घ्यावे व पाणी घालून पीठ करून घ्यावे.
मीठ घालून  ढवळून  घ्यावे.


घावण्याचे पीठ आंबोळी च्या पीठापेक्ष्या पातळ असावे.


भिड गरम करावे व त्यावर थोडेसे तेल पसरून घ्यावे.त्यावर पीठ घालून घावण तयार करावा.

थोडासा शिजला की लगेचच नारळाचे तयार सारण एका बाजूला घालावे.

अर्ध्या बाजूने परतवा व पुन्हा एकदा घावण्याचे पीठ भिडयावर घालावे.                                                                                                                     
अश्याप्रकारे अजून ७ वेळा घावण करून घ्यावे व सात पदरी घावण तयार करून घ्यावा.


वरुण साजूक तुपाची धार सोडावी व गरमा गरम खावयास दयावे.


Saat Kappi Ghavan Recipe,Ganpati Festival recipes, is offered to the diety Konkan. It is semicircuar in shape and cut into triangles while serving.Try It.

Tags: Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor


Related

Traditional 4650976828277684988

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item