Badam (Almond) Burfi Recipe in Marathi | बदाम बर्फी
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/08/badam-almond-burfi-recipe.html
पूर्व तयारीसाठी
लागणारा वेळ: १ तास
बनविण्यासाठी लागणारा
वेळ : २५ मिनिटे
साहित्य:
१) १ वाटी बदाम
२) साखर अडीच वाटी
पेक्ष्या थोडीशी कमी
३) १/२ वाटी दूध
४) वेलची पूड
५) तूप ताटाला
लावण्यासाठी
कृती:
बदाम पाण्यात साधारण
१ तास भिजू घालावे.
१ तासां नंतर बदामाची
साल काढून घ्यावी.
सोललेले बदाम व दूध
एकत्र करून मिक्सरला लावून पेस्ट करून घ्यावी.
दूधाऐवजी पाणीही
वापरु शकता.
पाणी किंवा दूध जास्त
वापरु नये नाहीतर बर्फी व्यवस्तीत बनणार नाही.
ताटाला तूप लावून
तयार ठेवावे.
जाड बुडाच्या भांडयात
साखर घ्यावी त्यात पुरेसे पाणी घालावे साधारण १/२ वाटी.
वेलची पूड घालावी.
मध्यम आचेवर साखर
वितळु दयावी सतत ढवळत रहावे व एक तारी पाक तयार करून घ्यावा.
एकदाका पाक झाला की
त्यात करून घेतलेली बदाम पेस्ट घालावी व सतत ढवळत रहावी.
मिश्रणाला उकळी येवू
लागेल.
सतत ढवळत राहावे.
साधारण १० मिनिटांनी
मिश्रण घट्ट होईल.
घट्ट झालेले मिश्रण
तूप लावलेल्या ताटावर काढून घ्यावे.
मिश्रण पसरून घ्यावे
१५ मिनिटांनी याचे तुकडे पाडावे.
बदाम बर्फी खाण्यासाठी तयार.
टिप:
१) ही बर्फी बनवताना
जाड बुडाच भांड वापरा व चमचा ही मोठा वापरा म्हणजे हाथाला चटके लागणार नाही.
२) ही बर्फी बनवताना
मंद आचेवरच बनवावी म्हणजे मिश्रण भांडयाला लागणार नाही.
३) बदाम पेस्ट
बनवताना बेताचे पाणी वापरावे म्हणजे बर्फी व्यवस्तीत होते.