Misal Pav Recipe-Easy Maharashtrian Breakfast Recipes | झटपट मिसळ पाव

Misal Pav Recipe in English:


Misal Pav recipe is easy-homemade and has all the signs of wholemeal.Its is consumed for snacks, brunches and get-togethers too.Enjoy yours now. Know More!


झणझणीत मिसळ पाव म्हटली की लगेचच सर्वांच्या तोंडाला कसे पाणी सुटते ना ! पण घरी बनवायची म्हणजे किती ती खटपट म्हणून बऱ्याच गृहिणी बनवायच टाळतात.

म्हणूनच तुमच्यासाठी खास ही झटपट होणारी मिसळ सोपी व चविला उत्कृष्ट.

पण चव पहायची असेल तर नक्की बनवून पहा.

आशा  करते तुम्हाला नक्की आवडेल.पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ :१५-२० मिनिटे
२ व्यक्तींसाठी


साहित्य:

१) २ वाटी मोड आलेले मूग आणि मटकी
२) २ मोठे कांदे
३) १ टोमॅटो
४) ३-४ छोटे चमचे मालवणी मसाला
५) १-२ छोटे चमचे लाल मिरची पूड
६) १/२ वाटी तेल
७) २ छोटे चमचे आल लसूण ची पेस्ट
८) मीठ चवीनुसारफोडणीचे साहित्य:

१) १ छोटा चमचा मोहरी
२) १ छोटा चमचा जिरे
३) चिमुठभर हींग
४) ४-५ कढीपत्त्याची पाने

इतर साहित्य:

१) १ वाटी बारिक चिरून घेतलेला कांदा
२) बारिक चिरलेली कोथिंबीर
३) साधारण पाव किलो फरसाण 
४) पाव

कृती:

मूग व  मटकी मोड काढून घ्यावे.


एका भांडयात तेल गरम करून घ्यावे.

त्यात फोडणीचे साहित्य घालावे, मोहरी, जिरे, हींग व कढीपत्त्याची पाने घालावि.

फोडणी झाली की लगेचच बारिक चिरलेला कांदा घालावा व लाल होईपर्यंत परतावा. 


कांदा लाल झाला की आल लसूण पेस्ट व बारिक चिरलेला टोमॅटो घालावा. 
टोमॅटो शिजला की त्यात मालवणी मसाला, लाल मिरची पूड व मीठ घालावे.२-३ मिनिटे परतून झाले की त्यात मोड काढलेले मूग व मटकी घालावि.


पाणी घालून झाकण ठेवून  चांगले शिजू दयावे साधारण १५ मिनिटांनी कढधान्य शिजले की  ग्यास 
बंद करावा. 

एका प्लेटमध्ये तयार उसळ घ्यावी त्यात फरसाण, बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून पावासोबत सर्व्ह करावी. 
Labels : maharashtrian misal, misal pav, usal pav, zanznit misal, pav misal, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor


Related

Traditional 1873839203340674328

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item