कोबी फ्लॉवर पोहे | Kobi Flower Pohe

Kobi Flower Pohe in English

वेळ :  

१५ मिनिटे , २ व्यक्तीन साठी.


साहित्य :

१)दगड़ी  पोहे २ वाट्या 
२)१/२ वाटी बारीक चिरलेली कोबी फ्लॉवर भाजी 
३)२ छोटे चमचे तेल 
४)१/२ चमचा जीरे 
५) १/२ चमचा मोहरी 
६)२ हिरव्या मिरच्या 
७) कढीपत्ता 
८)थोडीशी साखर 
९)कोथिंबिर
१०)हळद 
११)लिंबु 
१२)चवीनुसार मिठ 

कृती :

पोहे चांगले धुऊन मिठ आणि हळद लाऊन १० मिनिटे ठेवावे. 

नंतर एका कढ़ई मध्ये तेल गरम करुण  त्यात फोडणीचे साहित्य घालावे , हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता थोडासा भजलाकी कोबी भाजी घालून ५मिनिटे वाफ येऊ द्यावी. 

नंतर त्यात पोहे घालावे.


थोडेसे परतून झाकण लाऊन पुन्हा  ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी.

नंतर त्यात थोडीशी साखर आणि लिंबू रस घालावे. 

देताना  वरून कोथिबीर घालून द्यावी. 




Related

Breakfast 7592359769846314342

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item