मिश्र भाजीचे पोहे | Mishra Bhajiche Pohe

Mishra Bhajiche Pohe in English

वेळ :
  
१५ मिनिटे , २ व्यक्तीन साठी

साहित्य :

१)दगड़ी  पोहे २ वाट्या 
२)१वाटी मिश्र भाज्या (वाटणा,गाजर,फरसबी,बटाटा)
३)२ छोटे चमचे तेल
४)१/२ चमचा जीरे 
५) १/२ चमचा मोहरी
६)१/२ चमचा हळद  
७) कढीपत्ता  
८)२ हिरव्या मिरच्या 
९)१ वाटी बारीक़ चिरलेला कांदा  
१०)१/२ वाटी ओल खोबरं 
११)बारीक सेव 
१२)कोथिंबिर
१३)लिंबु 
१४)चवीनुसार मिठ 


कृती :

पोहे चांगले धुऊन आणि मिठ व हळद  लावून १० मिनिटे ठेवावे. 

एका  कढ़ई मध्ये तेल  गरम करुण  त्यात मोहरी,जिरे,हिरवी मिरची,कढीपत्ता व कांदा घालून परतून घ्यावेत.   

कढीपत्ता  व कांदा भाजला की  प्रथम वरील सर्व भाजा घालून ५मिनिटे झाकण लाऊन चांगली वाफ येऊ द्यावी बटाटे घालावे व नंतर त्यावर  पोहे घालावे.

थोडेसे परतून  घ्यावे, पुन्हा झाकण ठेऊन २-३ मिनिटे वाफ येऊ द्यावी. 

एका प्लेटमध्ये पोहे घेऊन त्यावर लिंबू पिळून  मग त्यावर ओल खोबर, शेव  व 
कोथिंबीर घालून खावयास घ्यावे . 

टीप :

भाज्या झाकून वाफवाल्यास लवकर शिजतात. 

Related

Breakfast 350708611455464169

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item