शाही पोहे | Shahi Pohe
https://nilamsrecipes.blogspot.com/2013/12/shahi-pohe.html?m=0
Shahi Pohe in English
वेळ :
१५ मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)दगड़ी पोहे २ वाट्या
२)काजू,बदाम,किसमिस पाऊन वाटी
३)२ छोटे चमचे तेल फोडणीसाठी
४)तळणासाठी तेल
५)१/२ चमचा जीरे
६) १/२ चमचा मोहरी
७)२ हिरव्या मिरच्या
८) कढीपत्ता
९)२ छोटे चमचे पिठी साखर
१०)हळद
११)चवीनुसार मिठ
कृती :
एका कढ़ईमध्ये तळणाचे तेल गरम करुण पोहे तळून घ्यावेत.
चाळणीवर पोहे घालून तेल गाळून घ्यावे .
नंतर त्याच तेलात काजू,बदाम घालून तळून घ्यावेत. किसमिस जास्तवेळ तळूनायेत.
नंतर दुसऱ्या भांड्यात फोड्णीसाठी तेल गरम करून त्यात फोडणीचे साहित्य घालावे , हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता थोडासा भजलाकी त्यात पोहे व तळलेले काजू,बदाम,किसमिस घालावे.
मिठ आणि हळद लाऊन घावे.
थोडेसे परतून, नंतर त्यात साखर घालावी.