उपिट/Uppit
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/02/upit.html?m=0
Uppit in English
वेळ :
२०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) मध्यम रवा १वाटी
२) २ चमचे तेल
३) १ बारीक चिरलेला कांदा
४) ५/६ कडीपत्याची पाने
५) १/२ चमचा मोहरी आणि जिरे
६) २ हिरव्या मिरच्या
७) उडदाची डाळ १ छोटा चमचा
८) चण्याची डाळ भिझवून घेतलेली २ छोटे चमचे
९) चविनुसार मिठ
१०) १/२चमचा साखर
११) लिंबू
१२) कोथिंबीर
कृती :
प्रथम एका भांड्यात तेल गरम करून रवा खमंग भाजून घ्यावा. भाजून झाल्यावर रवा बाजूला काढून घ्यावा .
पुन्हा थोडास तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घालून घ्यावा.
चण्याची
आणि उडदाची डाळ फोडणीत घालावी लालसर झाल्यावर रवा घालावा.
एका
भांडयात पाणी गरम करून घ्यावे,
हे पाणी थोडे थोडे करून रव्यावर घालावे,पाणी जरा जास्त घालावे.
मग त्यात मिठ घालावे.
सर्व पाणी सुकले की त्यात साखर घालावी.
५मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.
वरून लिंबू,कोथिंबीर घालून गरमा गरम खावयास
दयावेत.