उपमा /Upma

https://nilamsrecipes.blogspot.com/2014/02/upma.html
१)मध्यम रवा १वाटी
२)२ चमचे तेल
३)१ चिरलेला कांदा
४)५/६ कडीपत्याची पाने
५)१/२ चमचा मोहरी आणि जिरे
६)२ हिरव्या मिरच्या
७)उडदाची डाळ १ छोटा चमचा
८)शेगदाणे २ छोटे चमचे
९)चविनुसार मिठ
१०)१/२चमचा साखर
११)लिंबू
१२)कोथिंबीर
कृती :
प्रथम एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी घालून चांगली तडतडू दयावी.
त्यावर जिरे आणि उडीद डाळ घालून छान भाजून घ्यावी.
शेंगदाणे घालून घ्यावे. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालाव्या.
कांदा लालसर भाजून त्यावर रवा घालावा खमंग भाजून घ्यावा.
एका भांडयात पाणी गरम करावे.
वरील मिश्रणात हे गरम पाणी घालावे.
मीठ आणि साखर घालून ढवळावे.
गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्याल.
५ मिनिटे वाफ येऊ दयावी.
देताना वरून कोथिंबीर,खोबर आणि लिंबु रस घालुन दयावा.
१)मध्यम रवा १वाटी
प्रथम एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी घालून चांगली तडतडू दयावी.