बटाटा वडा | Batata Vada

Batata Vada in English

वेळ :  

२० मिनिटे (बटाटा उकड्ण्यासाठी लागणारा वेळ वगळून) 

२ व्यक्तीन साठी.


साहित्य :

१)२ मोठे उकडलेले  बटाटे 

२)१ वाटी चण्याच पिठ  
३) हळद
४) १/२ चमचा लाल तिखट 
५) १/२चमचे मोहरी व जिरे प्रत्येकी 
६) उडदाची डाळ एक छोटा चमचा 
७) कोथिंबीर 
८) एक चिमुठ खाण्याचा सोडा 
९) हिरवी मिरची 
१०) कढीपत्यांची पाने ४-५
११) २ छोटे चमचे तेल 
१२) तळणासाठी तेल 
१३) लिंबाचा रस 
१४) आवडीनुसार मिठ 


कृती :

बटाटे उकडून घ्यावे. सोलून चांगले चुरून घ्यावे. 

एका भांडयात तेल गरम करुण त्यात मोहरी,जिर कढीपत्ता,उडदाची डाळ घालून छान फोडणी करावी. 

चुरलेले बटाटे घालावे, आणि त्यावर हळद,मिठ घालून चांगले परतावे. 

कोथिंबीर व लिंबाचा रस घालून भाजी करून घ्यावी. 

भाजी थंड झाली की छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे व बाजूला करून ठेवावे. 


चण्याच्या पिठात पाणी, मिठ,हळद,लाल तिखट घालून चांगल एकजीव कराव. वरून खाण्याचा सोडा घालून पुन्हा एकदा एकजीव करून घ्यावे.


एका भांडयात तेल गरम करून घ्यावे. 

आता भाजीचा एक एक गोळा पिठात बुडवून घ्या


छान गरम तेलात तळून घ्यावा. 



Related

Snacks 7340666079504789246

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item