चवळीची उसळ | Chavlichi Usal

Chavlichi Usal in English

वेळ :  

१५ मिनिटे (चवळी भिजवण्यासाठी लागणारा वेळ वगळून)
२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)१ वाट्या भिजवलेली चवळी 




२)२छोटा चमचा तेल  
३)हळद
४)मालवणी मसाला १ चमचा किंवा आवडीनुसार 
५)कांदा एक मोठा 
६)१ वाटी खवलेले ओलें खोबरे 
७)४-५ कढीपत्त्याची पाने 
८)२-३ कोकम 
९)कोथिंबीर 
१०)आवडीनुसार मिठ 


कृती :

चवळी ६-७ तास भिजवून घ्यावी. 

एका भांडयात तेल गरम करुण कढीपत्ता घालून बारिक चिरलेला अर्धा कांदा घालून परतावं.  

कांदा चांगला  लाल होयी पर्यंत भाजावा. आता त्यात चवळी घालून चांगले परतावे. 

थोडसं पाणी घालून मालवणी मसाला घालून झाकण ठेऊन मध्यम ग्यासवर चवळी चांगली वाफवून घ्यावी. 

चवळी शिजेपर्यंत दुसरीकडे एका भांडयात एक चमचा तेल घालून त्यात कांदा भाजून ओलं खोबर हि भाजून घ्यावे. 

थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारिक वाटून घ्यावं. 




चवळी शिजली की हे वाटण त्यात घालावं. 

सोबत मिठ व कोकमपण घालावे. 

वरून छान कोथिंबीर घालावी.















गरमा गरम भातासोबत किंवा चपातीसोबत खावयास घ्यावी. 


Related

Dal-Usal-Kadhi 1623536292958628938

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item