दाल खिचडी। Dal Khichadi

वेळ :  
१५ मिनिटे
व्यक्तीन साठी.
साहित्य :
)दीड वाटी तांदूळ कोलम   
)पाव वाटी तुरीची डाळ 
)पाव वाटी मुगाची डाळ 
)हिरवे वाटणे 
)घेवड्याच्या शेंगा (बिन्स )
) मोठा कांदा 
)हळद
)- कढीपत्त्याची पाणे 
)आलं लसुन पेस्ट 
१०)जिरा मोहरी /२चमचा प्रत्येकी
११)एक चिमुठ हिंग 
१२) लाल अख्या मिरच्या  
१३) हिरवी मिरची 
१२)थोडेसे लाल तिखट 
१४)फोडणीसाठी तूप चमचे 
१५)एक तमालपत्र'
१६)कोथिंबीर 
१७)आवडीनुसार मिठ 

कृती :

खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि दाल एकत्र करून स्वछ धुऊन त्यातले पाणी काढून / तास निथळत ठेवावे.

कुकरमध्ये तुप गरम करावे त्यात फोडणीचे साहित्य घालावे. (जिर,मोहरी,हिंग,कढीपत्ता,तमालपत्र,लाल मिरची,हिरवी मिरची बारीक चिरून,कांदा,आलं लसुनची पेस्ट)

नंतर तांदूळ आणि दाल घालुन चांगले परतावे. चांगले कोरडे करावे

नंतर त्यात हिरवे वाटणे आणि घेवड्याच्या शेंगा बारीक चिरून घालाव्यात

चांगल्या परतून घ्याव्या. नंतर त्यात गरम पाणी घालावे. मसाला मिठ घालावे

एक उकळी आली कि कुकरचे झाकण लावून साधारण शिट्या काढाव्यात

कुकर थंड झाला कि वरून छान कोथिंबीर घालावी

खातेवेळी वरून छान तूप सोडावे











Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item