काजुची पातळ भाजी | Kajuchi Patal Bhaji

Kajuchi Patal Bhaji in English

वेळ :  

२० मिनिटे

२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)१ वाटी काजु 

२)१ मोठा कांदा 
३)हळद
४)खडा मासाला 
५)५-६ कढीपत्त्याची पाणे 
६)आलं लसुन पेस्ट 
७)१/२ वाटी सुख खोबर 
८)१/२ वाटी तेल 
९)कोथिंबीर 
१०)२ छोटे चमचे लाल तिखट 
११)आवडीनुसार मिठ 

खडा मसाला :
१)१ दालचिनीची काडी 
२)४ मिरी 
३)२ लवंग 
४)२चिमटी खसखस 
५)१चक्रीफुल 
६)४-५ वेलची 

कृती :

काजू सुखें असल्यास थोडयाशा कोमट पाण्यात ५-६ तास भिजत ठेवावे म्हणजे नरम होतात. 

एका भांडयात तेल गरम करून कढीपत्ता,आलं लसुन पेस्ट व बारीक चिरलेला अर्धा कांदा घालावा, लालसर भाजला की त्यात लाल तिखट घालुन चांगले परतून घ्यावे. 

दुसरीकडे एका भांडयात थोडस तेल घेऊन कांदा भाजून खडा मसाला व  खोबर लालसर करून घ्यावं. 

वाटण थंड झाल की मिक्सरला लावून बारिक वाटुन घ्यावे. 

हे वाटण मसाल्यात घालून छान तेल सुटेपर्यंत भजावे. तेल सुटू लागले कि काजू व मिठ घालून परतावे. 

आता आवश्यक तेवढे पाणी घालून छान पातळ भाजी बनवावी.  

वरून छान कोथिंबीर घालावी.  

Related

Vegetables 7520450946108145809

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item