फोडणीच्या शेवया | Vermicelli Upma


१५ मिनिटे

२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)२ वाटी शेवया 

२)१ मोठा कांदा 
३)हळद
४)१ चमचा मोहरी व जिरे प्रत्येकी 
५)७-८ कढीपत्याची पाने 
६)एक छोटा चमचा उडदाची डाळ


                                 

७)चीमुठभर हिंग 
८)हिरव्या मिरच्या २-३ किंवा आवडीनुसार 
९)१/२ वाटी ओला खोबर 
१०)२ छोटे चमचे तेल 
११)कोथिंबीर 
१२)पाणी 
१३)आवडीनुसार मिठ 
१४)एक छोटा चमचा साखर 


कृती :

एका भांडयात तेल गरम करून त्यात शेव घालून लाल होईपर्यंत भाजून घ्याव्या. बाजूला काढून घ्याव्या. 

त्याच भांडयात तेल गरम करून मोहरी,जिरे,कढीपत्ता घालून छान फोडणी करावी हिंग व हिरव्या मिरच्या घालाव्या. कांदा लालसर भाजून घ्यावा. 

उडदाची डाळ फोडणीत घालावी.

नंतर फोडणीत शेव घालुन पुन्हा एकदा छान परतून घ्यावे. 
आता १/२ कप पाणी गरम करून हळूहळू शेवांवर घालावे.

हळद,मिठ व साखर घालावे. 

५ मिनटे झाकण लावून वाफ येऊ दयावी. 

वरून छान खोबर व कोथिंबीर घालावी. 

गरम गरम खावयास घ्यावे.  



Related

Breakfast 192758282833824757

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item