काजुची सुकी भाजी | Kajuchi Suki Bhaji

Kajuchi Suki Bhaji in English

वेळ :  

२० मिनिटे
२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)१ वाटी ओले काजु 

२)१ मोठा कांदा 
३)हळद
४)२ छोटे चमचे  मालवणी मासाला 
५)५-६ कढीपत्त्याची पाणे 
६)आलं लसुन पेस्ट 
७)एक वाटी ओला खोबर 
८)२ छोटे चमचे तेल 
९)कोथिंबीर 
१०)आवडीनुसार मिठ 


कृती :

काजु ओले असल्यास साल काढून घ्यावी. काजु सुखें असल्यास थोडयाशा कोमट पाण्यात १ तास भिजत ठेवावे म्हणजे नरम होतात. 

एका भांडयात तेल गरम करून कढीपत्ता,आलं लसुन पेस्ट व बारीक चिरलेला अर्धा कांदा घालावा, लालसर भाजला की त्यात काजु आणि मालवणी मसाला घालुन चांगले परतून घ्यावे. 

तोडेसे पाणी घालुन  ५ मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ दयावी. 

दुसरीकडे एका भांडयात थोडस तेल घेऊन कांदा भाजून ओल खोबर लालसर करून घ्यावं. 

वाटण थंड झाल की मिक्सरला लावून बारिक वाटुन घ्यावे. 
काजु शिजल्यावर वाटण घालावे. 

वरून छान कोथिंबीर घालावी. 

Related

Vegetables 5361558827166964749

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item