लाल भोपळ्याचे घारगे
वेळ : १५मिनिटे , २ व्यक्तीन साठी. साहित्य : १) २ वाटया भोपळा सोलून कीस करून २)१ वाटी किसलेला गूळ ३)तांदुळाचे पिठ ४)१...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/04/blog-post_5157.html
वेळ :
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) २ वाटया भोपळा सोलून कीस करून
२)१ वाटी किसलेला गूळ
३)तांदुळाचे पिठ
४)१/२ चमचा तेल
५)तळणासाठी तेल
कृती :
प्रथम एका भांडयात भोपळा उकड्ण्यासाठी ठेवावा झाकण ठेवावे भोपळा वाफेवर शिजवावा.
भोपळा शिजला की त्यात गूळ घालावा व गूळ पुर्ण एकजीव झाला कि त्यात मावेल एवढे तांदळाचे पिठ घालावे. मिश्रण छान चमच्याने एकजीव करावे. आणि झाकण लावून वाफवून घ्यावे.
थंड झाले की छान मळून घ्यावे. थोडेसे तेल लावावे.
एका प्लास्टिक पेपर वर तेल लावून छान थापुन पुऱ्या कराव्या. गरम तेलात छान खरपुस तळून काढाव्या.