काबुली चण्याची उसळ | Kabuli Chanyachi Usal

Kabuli Chanyachi Usal in English

वेळ :  

१५ मिनिटे (चणे भिजवण्यासाठी लागणारा वेळ वगळून)
२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)१ वाट्या भिजवलेले  काबुली चणे 

२)२छोटा चमचा तेल  
३)हळद
४)मालवणी मसाला २ चमचे किंवा आवडीनुसार 
५)कांदा एक मोठा 
६)१ वाटी खवलेले ओलें खोबरे 
७)४-५ कढीपत्त्याची पाने 
८)कोथिंबीर 
९)१ टोम्याटो 
१०)आवडीनुसार मिठ 


कृती :

चणे ६-७ तास भिजवून घ्यावी. 

कुकरला लावून चणे उकडून घ्यावेत. 

एका भांडयात तेल गरम करुण कढीपत्ता घालून बारिक चिरलेला अर्धा कांदा घालून परतावं. 

कांदा चांगला  लाल होयी पर्यंत भाजावा. आता त्यात चणे घालून चांगले परतावे.

थोडसं पाणी घालून मालवणी मसाला घालून झाकण ठेऊन मध्यम ग्यासवर मसाला चांगला उकळू दयावा. 

एका भांडयात एक चमचा तेल घालून त्यात कांदा भाजून ओलं खोबर हि भाजून घ्यावे. 

थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारिक वाटून घ्यावं. मसाला शिजला  की हे वाटण आणि बारीक चिरलेला  टोम्याटो  त्यात घालावं. 

सोबत मिठ व घालावा. वरून छान कोथिंबीर घालावी.

Related

Dal-Usal-Kadhi 1913974092628746270

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item