भरली भेंडी | Bharli Bhendi

२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) २०-२२ मध्यम आकाराच्या भेंडी
२) २ वाटया ओलं खोबर
३) २ चमचे शेंगदाण्याच कूट
४) ४ हिरव्या मिरच्या
५) १/२ छोटा चमचा जिरे व धणे पूड
६) तेल
७) हळद
८) कोथिंबीर
९) आवडीनुसार मिठ
भेंडी स्वच्छ धवून एका स्वच्छ कापडाने फुसून घ्यावे.
भेंडीला मधून काप दयावे, पूर्ण चिरू नयेत नाहीतर सारण भरता येणार नाही.
सारण बनवण्यासाठी एका भांडयात ओंल खोबरं, शेंगदाण्याचे कूट, हिरव्या मिरच्या, जिरे व धणे पूड, हळद, कोथिंबीर एकत्र करून मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यावे.
सारणात मिठ घालावे.
एक एक भेंडी घेऊन सारण त्यात भरावे.
एका भांडयात तेल गरम करून त्यात हि भेंडी अलगदपणे एक एक करून सोडावी.
भांडयावर झाकण ठेवून मंद ग्यासवर भेंडी शिजू दयावी.
शिजल्यावर उरलेले सारण वरून घालून ते हि भाजून घ्यावे.