Doodhi Halwa (Bottle Groud Halwa) | दुधी हलवा

Doodhi Halwa in English














वेळ:  

२० मिनिटे,
३ व्यक्तींसाठी 

साहित्य:

१)  ३ वाटया किसलेला दुधी  
२)  १/२ लिटर दूध
३)  १ वाटी साखर

४)  २ मोठे चमचे तूप 
५) १/४ चमचे वेलची पूड 
६) १/२ वाटी बदाम, काजूचे तुकडे  व बेदाणे 


                    











कृती :

दुधीची साल काढून किसून घ्यावा किसताना पाण्यात किसावा नाहीतर कीस काळ पडते. 

किसून झल्यावर पाणी काढून घ्यावे. 

एक भांडयात तूप गरम  करून दुधीचे कीस त्यात परतून घ्यावे. 














दुसऱ्या बाजूला दूध गरम करत ठेवावे. 

हे दूध वरील दुधीच्या मिश्रणावर हळूहळू घालावे. 

दूध चांगले उकळून आटू दयावे. 

दूध आटले कि साखर घालावी. 

सतत ढवळत राहावे  भांडयाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. 

बदाम काजूचे तुकडे व बेदाणे घालावे. 

या हलव्याचे ताटात पसरून छान तुकडे हि पडता येतात. 




Related

Sweets 8738253150822630648

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item