हिरव्या मिरचीचा ठेचा | Hirvya Mirchicha Thecha

Hirvya Mirchicha Thecha in English


वेळ:  
१० मिनिटे

साहित्य:

१)  ७-८ हिरव्या मिरच्या 
२)   १ छोटा चमचा तेल
३)  २ छोटे चमचे सुख खोबर
४)  १ चमचा जिरे 

५)  २ चमचे पांढरे तिळ 
६)  ७-८ लसणाच्या पाकळ्या 
७) चिरलेली कोथिंबीर  २ मोठे चमचे
८)  मिठ चविनुसार 


कृती :

कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या घ्याव्यात.  मिरच्याचे तोडून दोन तुकडे करावे.
एका भांडयात तेल गरम करावे त्यात जिरे,लसणाच्या पाकळ्या थोडयाशा ठेचून घालाव्यात,
मिरच्यांचे तुकडे व तिळ घालून चांगले भाजून घ्याव्यात. 



वरून खोबरे व चिरलेली कोथिंबीर घालून २-३ मिनिटे मिश्रण अजून ढवळावे. 

मिरच्या व लसुन लालसर झाल्या कि हे मिश्रण एका भांडयात काढून थंड करून घ्यावे. 

छोटा  खलबत्ता असल्यात जाडसर कुटून घ्यावे. मिक्सरमध्ये हि जाडसर वाटता येईल. 

हा ठेचा भाकरीसोबत किंवा तोंडी लावण्यासही घेऊ शकतो. 



Related

Pickles-Chatni-Thecha 8596118529643231649

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item