मसूर आमटी | Masoor Amti
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/07/masoor-amti_31.html
वेळ:
१५ मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१)१/२ वाटी मसूर
२)१ कांदा
३) हळद
४) ४-५ कढीपत्त्याची पाने
५) १वाटी किसलेले खोबरे
६) २ छोटे चमचे मालवणी मसाला
७) २-३ लसणाच्या पाकळ्या
८) २ छोटे चमचे तेल
९) कोथिंबीर
१०) मिठ चविनुसार
११) २-३ कोकम
कृती:
मसूर २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी.
थोडेसे
पाणी घालून कुकरला
लावून २ शिट्या
काढून मसूर उकडून
घ्यावी.
जास्त उकडू नये.
एका भांडयात एक चमचा तेल घालून त्यात कांदा भाजून ओलं खोबर हि भाजून घ्यावे.
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारिक वाटून घ्यावं.
१०-१५ मिनिटांनी कुकर उघडून १ कप पाणी घालावे.
एका
भांडयात तेल गरम
करून त्यात ठेचलेली
लसुन घालावी. लालसर
झाली की कढीपत्ता,हळद व मालवणी
मसाला घालून त्यावर
मसूर घालावी आणि
एक उकळी येऊ
दयावी.
आता वरील वाटण, कोकम व मिठ घालून ५ मिनिटे उकळू दयावे.
कोथिंबीर घालून गरमा गरम भातासोबत खावयास दयावे.