Sabudana Thalipeeth | साबुदाणा थालीपीठ


वेळ:
१५ मिनिटे,
 व्यक्तीन साठी.

साहित्य :
) १ वाटी साबुदाणा 
१ बटाटा उकडून कुस्करलेल  
)  १/२ वाटी शेंगदाण्याच  कुट 
४)   हिरव्या मिरच्या
)  / छोटा चमचा लिंबू रस  
)  कोथिंबीर 
)  जिरे  
)  मिठ  चवीनुसार 
१०) १/२ छोटा चमचा साखर 
११) १/२ वाटी तूप

कृती :

साबुदाणा  धुवून पाणी काढून  ५-६ तास बाजूला करून ठेवावा. 

आवश्यक असल्यास थोडेसे पाणी घालून भिजू ठेवावा.  


शेंगदाणे  भाजून थंड करावे.  शेंगदाण्याची साल काढून घ्यावी. 

शेंगदाणे व मिरची एकत्र करून वाटून कुट करून घ्यावे. 

एका भांडयात साबुदाणा घेऊन त्यात वाटलेले शेंगदाणे, कुस्करून घेतलेला बटाटा जिरे,मिठ, साखर, लिंबाचा रस व  बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व एकत्र करून चांगले मळून घ्यावे


मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यावे. 

प्लास्टिकच्या तुकड्यावर  थोडेसे तूप लावून त्यावर एक गोळा थापून घ्यावा. थालीपिठाच्या मध्यभागी एक छिद्र पाडावे. 

नॉनस्टिक तव्यावर थोडेसे तूप सोडावे. थालीपीठ घालवे व मध्यभागी छीद्रात थोडेसे तूप सोडावे. 

झाकण ठेवून मध्यम आचेवर एक वाफ काढावी. 

दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यावे. 

दह्यासोबत खावयास दयावे.  














टिप:

साबुदाणा चांगला भिजण्यासाठी धुतल्यावर थोडेसे पाणी ठेऊन भिजवावा म्हणजे तो छान फुगून येतो. 

भिजवलेला साबुदाणा भिजला कि नाही हे पाहण्यासाठी एखादा साबुदाणा हाथावर घेऊन बोटाने दाबून पहावा. 

Related

Navratri 5520325762619746088

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item