मालवणी मसाला | Malvani Masala
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/malvani-masala_7.html?m=0
वेळ :
साहित्य :
१)
१/२ किलो बेडगी मिरची
२)
१/२ किलो संकेश्वरी मिरची
३)
५०० ग्राम धणे
४)
१२५ ग्राम काळी मिरी
५)५० ग्राम दालचिनी
६) ५० ग्राम लवंग
७) ५० ग्राम जावित्री
८) ५० ग्राम चक्रीफुल
९)
५० ग्राम काळी वेलची (मसाला वेलची)
१०) ५० ग्राम मोहरी
११)५० ग्राम बडीशेप
१२)
५० ग्राम खसखस
१३)
५० ग्राम दगडीफुल
१४)
५० ग्राम तमालपत्र
१५)
२५ ग्राम वेलची
१६)
अडीच जायफळ
१७)
५० ग्राम अख्खी हळद
१८)
५० ग्राम हिंग
कृती:
एका
भांडयात थोडस तेल गरम करून त्यात मिरची घालून छान परतावी.
मिरच्या छान खमंग लालसर भाजून घ्याव्यात.
मिरच्या कुरकुरीत भाजल्या कि बाजूला काढून घ्याव्यात.
मसाल्याला चांगला सुगंध सुटेपर्यंत परतत राहावे.
मसाले
व मिरच्या एका प्लेटमध्ये बाजूला काढून थंड होऊ दयावे.
हे
मिश्रण थंड झाले कि मिक्सरला लावून बारीक पूड करून घ्यावी.
पूड
थंड झाली कि बरणीमध्ये भरून ठेवावी.