वडा भात | Vada Bhat
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/vada-bhat.html?m=0
वेळ :
२० मिनिटे
वाड्याचे साहित्य:
१) १/२ कप चना डाळ
१) १/२ कप चना डाळ
२) २-३ चमचे मटकी डाळ
३) २ चमचे उरडाची डाळ
४) २ चमचे तूर डाळ
५) २ चमचे मसूर डाळ
६) २ चमचे मुंग डाळ
७) ७-८ लसणाच्या पाकळ्या
८) हळद
९)
७-८ हिरव्या मिरच्या
१०) कोथिंबीर
१०) जिरे
११) मिठ चविनुसार
भाताचे साहित्य :
१) १ कप बासमती तांदूळ
२) दीड कप पाणी
३) मिठ चविनुसार
फोडणीचे साहित्य :
१) तेल
२) १/२ चमचा जिरे
३) १/२ चमचा मोहरी
४) एक चिमुठ हिंग
५) २ अख्या लाल मिरच्या
वड्याची कृती :
सगळ्या डाळी एकत्र धुवून ३ तास भिजू घालाव्यात.
३ तासाने पाणी काढून त्यात हिरव्या मिरच्या, लसुन पाकळ्या , कोथिंबीर व मिठ
घालून मिक्सरला जाडसर वाटून घ्यावे.
वरील मिश्रणात जिर घालून घ्यावे .
भाताची कृती :
तांदूळ धुवून घ्यावे. पाणी व मिठ घालून कुकरला ३ शिट्या काढाव्यात.
फोडीची कृती:
एका छोटया कढईत फोडणीसाठी तेल गरम करावे त्यात मोहरी घालावी ती तडतडली कि हिंग कढीपत्ता व जिरे घालावे थोडसे भाजले कि लाल मिरच्या तोडून घालाव्यात.
मिरच्या लालसर झाल्या कि ग्यास बंद करावा.
वाढणीसाठी :
ताटात आधी भात घ्यावा त्यावर ३-४ वडे घालावे.
हे वडे कुस्करून भातात घालावे व वरून तयार फोडणी घालावी.