Vangyache Bharit | वांग्याचे भरीत

वेळ:
  
३० मिनिटे
२ व्यक्तींसाठी 


साहित्य:

१) १ मोठे वांगे  
२) २ मोठे कांदे बारिक चिरून 
३) १ छोटा टोमॅटो बारिक चिरून 
४) बारिक चिरलेली कोथिंबिर
५) ५-६ हिरव्या मिरच्या  
६) आंल लसूण पेस्ट 
७) १/२  छोटा चमचा मोहरी 
८) कढीपत्ता 
९ ) हळद  
११) १/२  छोटा चमचा लाल मिरची पूड 
१२) २ चमचे शेंगदाणे 
१३) तेल 
१४) मीठ 

कृती:

वांगे खरपुस भाजून घ्यावे.



एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला थोडीशी तड़तड़ली की त्यात कढीपत्ता आंल लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, लाल मिरची पूड घालून कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा.

कांदा छान परतून त्यात शेंगदाणे घालावे.

वांग गार झाल की सोलुन आतील गर बाजूला काढावा आणि सुरीन चिरून घ्यावे.

शेंगदाणे झाले की टोमॅटो नरम होईपर्यंत परतवा.

चिरलेले वांगे व मीठ घालून परतावे.

खाली चिकटनार नाही याची काळजी घ्यावी.

वरुन  बारिक चिरलेली कोथिंबिर घालावी.

भाकरी सोबत सर्व्ह करावे.






Related

Vegetables 6742360934816677707

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item