चकली भाजनी
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/10/chakli-bhajani.html
२० मिनिटे
साहित्य:
१) १ कीलो तांदूळ
२) २ कप पोहे
३) २५० ग्राम चना डाळ
४) ५० ग्राम उरडाची डाळ
५) १०० ग्राम मुगाची डाळ
६) १/२ कप धणे
७) १/४ कप जिरे
८) १०-१२ लवंग
९) १० -१२ काळी मिरी
१०) दालचीनी २
कृती:
तांदूळ स्वच्छ धुवून फ्यानखाली पसरून वळवून घ्या.
सर्व डाळी निवडून कॉटनच्या कपड्यात चोळून घ्या.
म्हणजे त्यावर असलेली पावडर निघून जाईल.
या डाळी एक एक करून वेगवेगळ्या लालसर भाजून घ्या.
आणि बाजूला करून घ्या.
आता तांदूळ व पोहेही वेगवेगळे लालसर भाजून घ्या.
धणे, जिरे, लवंग, काळी मिरी व दालचीनी खमंग भाजून घ्या.
हे पदार्थ थंड होवू दया.
एकदाका हे पदार्थ थंड झाले की वाटून घ्या आणि पीठ तयार करून घ्या.
गिरणितून काढून अनल्यास फारच उत्तम.