काजू कतली
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/10/kaju-katli_20.html
वेळ:
४० मिनिटे,
नग :
१२-१४ तुकडे
साहित्य:
१) १ कप काजू
२) १/२ कप साखर
३) ५ मोठे
चमचे पाणी
४) १ मोठे
चमचे तूप
५) १ चमचा
वेलची पूड
६) चांदीचा वर्ख आवडीनुसार
६) चांदीचा वर्ख आवडीनुसार
कृती :
काजूचे तुकडे मिक्सला लावून त्याची पावडर करून घ्या.
जास्त बारीक़ पूड
करू नये.
जाड बुडाच्या भांड्यात पानी व साखर
घालून पाक बनवून
घ्यावा.
साखर वितळेपर्यंत ढवळत रहा.
साधारण २-३ मिनिटे पाक उकळु दया.
काजूची पूड घालून चांगली ढवळून घ्या.
५-६ मिनिटे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळून घ्या.
एका भांड्यात मिश्रण काढून घ्या.
थोडस तूप व वेलची पूड घाला.
आता मिश्रण साधारण मळता येईल एवढे थंड झाले की चांगले मळून घ्या.
पोळपाटाला तूप लावून मिश्रण त्यावर घ्यावे वरुन बटर पेपर लावून घ्या.
पोळपाटावर मिश्रणाची पोळी लाटून साधारण ३-४ मि मि जाडीची लाटावी.
बटर पेपर काढून चांदीचा वर्ख लावावा.
मिश्रण थंड झाले की त्याचे चौकोणी तुकडे पाडून घ्यावे.
मिश्रण थंड झाले की त्याचे चौकोणी तुकडे पाडून घ्यावे.
एयर टाइड कन्टेनर मध्ये ठेवाव्यात.