कांदा बटाटा रस्सा
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/10/kanda-batata-rassa_94.html
वेळ:
१५ मिनिटे
२ व्यक्तींसाठी.
१) ४ बटाटा
२) २ टोम्याटो
३) २ मध्यम आकाराचे कांदे
४) हळद
५) २ छोटे चमचे मालवणी मसाला
६) ५-६ कढ़ीपत्त्याची पाने
७) आल लसुन पेस्ट
८) २ चमचे तेल
८) २ चमचे तेल
९) कोथिंबीर
१०) मीठ चवीनुसार
१०) मीठ चवीनुसार
कृती:
कांदा, टोम्याटो व बटाट्याच्या एकसारख्या फोड़ी करून घ्याव्यात.
एका कढईत तेल गरम करून त्यात कढ़ीपत्त्याची पाने, आल लसुन पेस्ट आणि चिरलेला कांदा घालावा.
कांदा लालसर होईपर्यंत परतावा.
चिरलेला टोम्याटो घालवा.
तेल वेगळे झाले की त्यात मसाला, हळद व मीठ घालावे.
बटाट्याच्या फोड़ी घालून परतून घ्यावे.
बटाटे शिजले की वरुन चिरलेली कोथिंबीर घालून गरमच चपाती किंवा भातासोबत खायला दयावी.