फोडणीचा भात
Phodnicha Bhat in English वेळ : १५ मिनिटे , २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) २ - ३ कप साधा बनवून घेतलेला भ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/11/phodnicha-bhat_24.html
वेळ:
१५ मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) २-३ कप साधा बनवून घेतलेला भात
२) १ मध्यम आकाराचा कांदा
३) आंल लसूण पेस्ट
४) हळद
५) कोथिंबीर बारिक चिरलेली
६) १/४ छोटा चमचा लाल मिरची पूड
७) १ छोटा बटाटा बारिक फोडी करून
८) १/२ वाटी शेंगदाणे
९) मीठ गरजेनुसार
फोडणीसाठी:
१) १ छोटा चमचा जिरे
२) ७-८ कढीपत्त्याची पाने
३) ३ मोठे चमचे तेल
कृती:
साधा मोकळा भात बनवून घ्यावा किंवा रात्रीचा उरलेला भातसुद्धा वापरू शकता.
एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून जिरे व कढीपत्त्याची पाने घालावी.
लगेचच उभा चिरलेला कांदा, शेंगदाणे व बारिक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी घालाव्या.
झाकण ठेवून मंद ग्यासवर बटाटा शिजू दया.
बटाटा शिजला की लगेचच आंल लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पूड घालून २-३ सेकंद परतावे.
आता शिजवलेला भात व मीठ घालून परतावे झाकण ठेवून ५ मिनिटे मंद ग्यासवर भात शिजू दयावा.
सर्विंग बाउल मध्ये भात काढून घ्या त्यावर कोथिंबीर घालून गरमच सर्व्ह करा.