फोडणीचे ताक
Podniche Tak in English: वेळ : ५ मिनिटे साहित्य : १ ) २ कप दही २ ) १ कप पाणी ३ ) १ / २ ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/11/podniche-tak.html?m=0
साहित्य:
१) २ कप दही
२) १ कप पाणी
३) १/२ छोटा चमचा साखर
४) मीठ चवीनुसार
फोडणीचे साहित्य :
१) १/२ छोटा चमचा मोहरी
२) १/२ चमचा जिरे
३) चिमुठभर हींग
४) ५-६ कढीपत्त्याची पाने
५) १ छोटा चमचा तेल
६) कोथिंबीर बारीक़ चिरलेली
कृती:
प्रथम दही रवीने घोटून घ्यावे. मग पानी घालून पुन्हा एकदा घुसळून ताक बनवून घ्यावे.
फोडणी तयार करून घ्यावी.
एका भांड्यात तेल गरम करून मोहरी घालावी ती तडतडली की जिरे, हींग व कढीपत्त्याची पाने व थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून परतावी.
ही फोडणी घुसळलेल्या ताकावर घालावी.
ताक गरम केले तर ते सतत ढवळत राहावे किंवा किंचित गरम करावे नाही तर ते फाटन्याची शक्यता असते.
हे ताक गरम न करता ही घेता येते.
सर्व्ह करताना वरुन थोडी बारीक़ चिरलेली कोथिंबीर घालून दयावे.