उपवासाची बटाटा भाजी | Upavasachi Batata Bhaji
Upavasachi Batata Bhaji in English वेळ : २० मिनिटे २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) २ - ३ उकडलेले बटाटे २ ) ५...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/12/upavasachi-batata-bhaji.html
२० मिनिटे
२ व्यक्तींसाठी.
साहित्य :
१) २-३ उकडलेले बटाटे
२) ५-६ हिरव्या मिरच्या
३) १/२ वाटी शेंगदाणा कूट
४) ४-५ कढीपत्त्याची पाने
५) १/२ छोटा चमचा जीरे
६) कोथिंबीर बारीक चिरून
७) ओल खोबर
८) १ छोटा चमचा साखर
९) तेल फोडणीसाठी
१०) मीठ चवीनुसार
कृती:
प्रथम एका भांडयात तेल गरम करून त्यात जीरे, कढीपत्ता व बारिक चिरलेली हिरवी मिरची घालावी.
शेंगदाण्याच कूट घालून ५ मिनिटे परतावे.
उकडून घेतलेले बटाटे सोलून त्यांच्या बारिक फोडी करून त्या वरच्या फोडणीवर घालून चांगले परतून घ्यावे.
मीठ घालून परतावे झाकण ठेवून ५ मिनिटे मंद ग्यासवर भाजी होवू दयावी.
साखर, खोबरे व कोथिंबीर घालून खावयास घ्यावी.