Farali Misal In English वेळ : ३० मिनिटे २ व्यक्तीन साठी . साहित्य : १ ) १ वाटी साबुदाणा खिचडी २ ) १ ...
३० मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) १ वाटी साबुदाणा खिचडी
२) १ वाटी उपवासाची बटाटा भाजी
३) १ वाटी बटाटा चिवडा
४) १/२ उकडलेले शेंगदाने
५) १/२ वाटी शेंगदाण्याची आमटी
६) १ वाटी ओल खोबर
७) २-३ हिरव्या मिरच्या
८) १ छोटा चमचा जीरे
९) तूप
१०) आवडीनुसार मिठ
११) दही १/२ वाटी
१२) कोथिंबीर
शेंगदाणे ६-७ तास भिजत घालून कुकरला लावून थोडे मीठ घालून उकडून घ्यावे.
शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून थंड झाले की सोलून घ्यावे.
त्यात हिरवी, खोबर, कोथिंबीर व मिरची घालून पेस्ट करून घ्यावी.
एका भांडयात थोडेसे तूप गरम करून त्यात जीरे घालावे व त्यावर शेंगदाण्याची पेस्ट घालून चमच्याने ढवळून घ्यावे.
मीठ व आवश्यक पाणी घालून शेंगदाण्याची आमटी करून घ्यावी.
मिसळ करताना प्रथम एका बाउल मध्ये साबुदाणा खिचडी घ्यावी त्यावर बटाटा भाजी, शेंगदाणा आमटी, बटाटा चिवडा घालावा आवडत असल्यास दही घालावे व बारिक चिरलेली कोथींबिर घालून सर्व्ह करा.
टिप:
बटाटयाचा चिवडा कुठल्याही फरसानाच्या दुकानात सहज मिळतो तो वापरु शकता.
तुम्ही या मिसळमध्ये बारिक चिरलेली काकडी सुद्धा घालू शकता त्याची चव खूप छान लागते.