बाळ मेथीची भाजी
Baby (Small) Methi Bhaji in English तयारीसाठीचा वेळ : १० मिनिटे बनवण्यासाठीचा वेळ : १० मिनिटे २ व्यक्तींसाठी . ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/baby-small-methi-bhaji_27.html
साहित्य:
१) २ वाटया किंवा १०-१२ जुडया मेथी
२) १ कांदा
३) २-३ हिरव्या मिरच्या
४) १ छोटा चमचा हळद
५) तेल
६) १/२ वाटी खोबर
७) मीठ चवीनुसार
७) मीठ चवीनुसार
कृती:
बाळ मेथीची मूळ तोडून घ्यावी.
मेथीची पान वेगळी करून घ्यावी.
एका चाळनीवर घेवून ३-४ वेळा धुवून घ्यावी म्हणजे त्यातील माती निघून जाईल.
निथळुन घ्यावी व आता बारीक़ चिरून घ्यावी.
एका भांडयात तेल गरम करून त्यात जिरे घालावे.
साधारण २-३ सेकंदानी बारीक चिरलेला कांदा घालावा व छान परतून घ्यावा.
हिरव्या मिरच्या घालाव्या.
२-३ मिनिटांनी बारीक चिरलेली मेथी, मीठ व हळद घालावी.
झाकण ठेवावे व त्यावर थोडेसे पाणी घालावे.
मध्यम आचेवर भाजी होवू दयावी.
मधे मधे ढवळावी म्हणजे खाली लागणार नाही.
पाण्याची आवश्यता नाही ही भाजी अशीच शिजते.
झाली की लगेचच वरुन खोबर घालून भाकरीसोबत किंवा चपाती सोबत सर्व्ह करावी.
खुपच सुंदर रेसीपी आहेत
ReplyDeleteखुपच सुंदर रेसीपी आहेत
ReplyDelete